ह्रदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू, मुख्यालयात होती नेमणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 06:27 PM2021-02-15T18:27:40+5:302021-02-15T18:28:35+5:30

कामावर येत असताना आली छातीत कळ 

Policeman dies of heart attack, appointment at headquarters in navi mumbai | ह्रदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू, मुख्यालयात होती नेमणूक 

ह्रदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू, मुख्यालयात होती नेमणूक 

googlenewsNext
ठळक मुद्देधनराज महाजन (५४) असे मृत्यू पावलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात त्यांची नेमणूक होती. नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी ते ठाणे येथून मोटरसायकलवरून कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात कामावर येत होते.

नवी मुंबई : हृदयविकाराचा झटका आल्याने पोलीस हवालदाराच्या मृत्यूची घटना सोमवारी दुपारी घडली. सकाळी ते कामावर येत असताना छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

धनराज महाजन (५४) असे मृत्यू पावलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात त्यांची नेमणूक होती. नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी ते ठाणे येथून मोटरसायकलवरून कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात कामावर येत होते. या दरम्यान ठाणेत असतानाच त्यांना छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांनी आज कामावर येत नसल्याचे वरिष्ठांना कळवून पुन्हा घरी गेले असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावू लागल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी हे इतर एका कर्मचाऱ्यासह त्यांच्या मदतीला गेले. यावेळी महाजन यांना तातडीने आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न झाले. मात्र दुपारच्या सुमारास महाजन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्या पश्च्यात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. रविवारी एपीएमसी पोलिसठाण्यात सहायक निरीक्षक भूषण पवार यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सोमवारी महाजन यांच्या निधनाच्या घटनेमुळे नवी मुंबईपोलिसदलात हळहळ व्यक्त होत आहे. 
 

Web Title: Policeman dies of heart attack, appointment at headquarters in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.