Police officer's death in road accident | अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू 
अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू 

पनवेल - अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात तळोजा एमआयडीसी मधील नागझरी गावाजवळ झाला.  रवींद्र देवरे असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते नवी मुंबई पोलीस मुख्यालयात लेखा शाखेत नियुक्तीवर होते.  

देवरे हे कल्याणमध्ये राहत होते. ड्युटी संपल्यावर घरी परतत असताना तळोजा एमआयडीसी मधील मार्गावरून घरी जात असताना नागझरी गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत देवरे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. फरार आरोपी वाहन चालकाचा शोध सुरु आहे. या मार्गावर यापूर्वी देखील तळोजा वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याचा अशाच प्रकारे वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.


Web Title: Police officer's death in road accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.