सराईत गुन्हेगार फय्याज शेखला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 13:19 IST2018-10-20T13:16:33+5:302018-10-20T13:19:28+5:30
खालापूर येथील नढाळ आदिवासी पाड्यातून सराईत गुन्हेगार फय्याज शेखला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सराईत गुन्हेगार फय्याज शेखला अटक
नवी मुंबई - खालापूर येथील नढाळ आदिवासी पाड्यातून सराईत गुन्हेगार फय्याज शेखला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनेक महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु दोनदा तो पोलिसांवर गोळीबार करून पळाला होता. अखेर शनिवारी तो पोलिसांच्या हाती लागला.
फय्याज शेखला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी त्याने पोलिसांवर गोळी झाडून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी झाडलेली गोळी पायावर लागल्याने तो जखमी झाला आणि पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या विरोधात राज्यभर 81 गुन्हे दाखल असून त्यापैकी 58 गुन्हे नवी मुंबईत दाखल आहेत. सतत राहण्याची ठिकाणे बदलून व वेशभूषा बदलून पोलिसांना तो चकमा देत होता. चार दिवसांपूर्वी देखील त्याने वसई येथे नवी मुंबई पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला होता.