शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:29 IST

साहित्य समाजमनाचा आरसा आहे.

पनवेल : साहित्य समाजमनाचा आरसा आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होते. कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे तर कवी संमेलन हे उत्सवांचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे केले.कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्तर-दक्षिण रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कवितांची कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप नेते वाय.टी.देशमुख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्र मास सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, अरु ण म्हात्रे, कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, जनसंपर्क प्रमुख, रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, नाटककार मोहन भोईर, उत्तर रायगड कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे तसेच अ.वि.जंगम, सुनंदा देशमुख, सुधीर शेठ उपस्थित होते.मनुष्याचे रडणे-हसणे ही साहित्याची साधने असून बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली जाणार आहे, खऱ्या अर्थाने ही साहित्यिकांची फलश्रुती आहे, असे मत मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केले. सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे यांनी मार्गदर्शन करताना, साहित्यिक घडण्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे. पुस्तके वाचून कविता तयार होत नाही, त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. जितक्या स्वभावाचे लोक असतात तितक्या स्वभावाच्या कविता निर्माण होतात. सकस साहित्य कलाकृती व्हायची असेल तर अनुभूती असावी लागते. अवतीभोवती घडणाºया घटनांची साहित्यकृती निर्माण केली तर वाचकांच्या पसंतीस येते असे त्यांनी सांगितले. कवी अरु ण म्हात्रे यांनी कवितेची कुठेही शाळा नाही, कुठेही रजिस्टर नाही. कवी जो कविता सादर करतो त्याला रसिकांची दाद मिळते तेव्हा ती कविता उत्कृष्ट होते. शब्द साठा असणारे अनेक कवी आहेत. पण शब्दांपेक्षा भावनेतून कविता आली पाहिजे. काळजातून विद्रोह असला तर विद्रोही कविता निर्माण होते. कवी बनायचे असेल तर खूप कविता वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत असे सांगितले. दुपारच्या खुल्या कवी संमेलनात रायगड जिल्ह्यातील अनेक कवींनी कविता सादर केल्या. यावेळी मधु मंगेश कर्णिक, रामदास फुटाणे व अरुण म्हात्रे, नमिता कीर, प्रा.एल.बी.पाटील हे आवर्जून उपस्थित होते. हे कवी संमेलन अ‍ॅड.चंद्रकांत मढवी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड कोमसापच्या कवींना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अ‍ॅड.चंद्रकांत मढवी, नारायण सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला. खुल्या कवी संमेलनामध्ये झालेल्या काव्य स्पर्धेत जुईली आतीतकर हिने प्रथम क्र मांक, अरुण म्हात्रे यांनी द्वितीय क्र मांक, बी.डी.घरत यांना तृतीय क्र मांक तर दीपक सकपाळ आणि रवींद्र सोनावणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. संमेलनाचे सूत्रसंचालन जनार्दन सताणे, जयमाला जांभळे यांनी केले.