शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पीएनपीसंबंधी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:52 IST

पुण्याच्या हरित लवादाने थेट पर्यावरण मंत्रालयाच्या संचालकाविरोधातच वीस हजारांचा वॉरंट जारी केले आहे. राज्य आणि केंद्रीय पर्यावरण विभागास वारंवार संधी देऊनही त्यांनी

अलिबाग : पुण्याच्या हरित लवादाने थेट पर्यावरण मंत्रालयाच्या संचालकाविरोधातच वीस हजारांचा वॉरंट जारी केले आहे. राज्य आणि केंद्रीय पर्यावरण विभागास वारंवार संधी देऊनही त्यांनी पीएनपी मेरीटाइम सर्व्हिसेस प्रा.लि.बाबत योग्य ती माहिती न दिल्याने हे पाऊल उचलण्यात आले. हे वॉरंट नवी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांमार्फत बजाविण्यात यावे. त्याचप्रमाणे, १९ जानेवारी २०१६ पर्यंत त्यांनी म्हणणे मांडावे, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायाधीश व्ही. आर. किनगावकर यांनी दिले. पीएनपी कंपनीने धरमतर खाडी परिसरामध्ये सीआरझेड, सरकारी जागेत अतिक्रमण, बांधकाम, पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या कांदळवनांची बेसुमार तोड केली आहे. या सह अन्य मुद्द्यांवर सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. सुरेंद्र ढवळे, स्थानिक शेतकरी द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी २०१४ साली हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. या बाबतची सुनावणी २१ डिसेंबर २०१५ रोजी पार पडली. पुढील सुनावणी १९ जानेवारी २०१६ ला होणार आहे. हरित लवादाने नेमलेल्या रायगड जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, अलिबागचे प्रांताधिकारी आणि मुंबईच्या महाराष्ट्र सागरी किनारा नियमन प्राधिकरणाच्या त्रिसदस्यीय समितीने हरित लवादाकडे आपला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये समितीने पीएनपी कंपनीच्या ताब्यातील क्षेत्र, कंपनीची सरकारी जमिनीवरील रेल्वे लाइन, तेथे कंपनीने केलेली बांधकामे या बाबतची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे लवादाकडे सादर केली.