शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

प्लास्टीक बंदीचे आदेश कागदावरच; पनवेल महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:09 AM

बंदी असलेल्या साहित्यांचा सर्रास वापर

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टीकच्या वस्तू उत्पादनांवर व वापरावर शासनाने बंदी घातली आहे. परंतु पनवेल बाजारपेठ तसेच रोज बाजार मार्केटमध्ये प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. बाजारपेठेतील महापालिकेची प्लास्टीकविरोधी कारवाई थंड पडल्याने दुकानदार, हातगाडी तसेच भाजी विक्रेत्यांचे फावले आहे. दिवसेंदिवस वाढता प्लास्टीकचा वापर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

पर्यावरणास धोकादायक ठरत असलेल्या मायक्रो पॉलिथीनच्या पिशव्या तसेच प्लास्टीकपासून बनविण्यात आलेल्या पत्रावळी, प्लेट, ग्लास आदी विक्री आणि वापरावर शासनाने २३ जून २०१८ रोजी बंदी आणली. तेव्हापासून अनेक ठिकाणी कारवाईसुद्धा केली. त्याचबरोबर पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक दुकानांवर छापा मारून प्लास्टीक कॅरीबॅग व प्लास्टीक वस्तू वापरणाºयावर दंडात्मक कारवाई केली. त्यात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या गोडाऊनवरसुद्धा छापा मारण्यात आला होता.

सतत कारवाई होत असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात प्लास्टीक बंदी पूर्णपणे यशस्वी झाली होती. परंतु कोरोना लॉकडाऊन काळात निर्बंध असलेल्या प्लास्टीकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेचे कर्मचारी कोविड १९ च्या कामात व्यस्त आहेत. यामुळे दुर्लक्ष आणि कारवाईला स्थगिती दिल्याने भाजीविक्रेते तसेच हातगाडीवाले कॅरीबॅगचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. प्लास्टीक वापर वाढल्याने प्लास्टीक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गटारे, नाले पुन्हा एकदा तुंबणार

च्पनवेल परिसरात प्लास्टीक कॅरीबॅगचा सर्रास वापर झाल्याने, काम झाल्यानंतर त्या कॅरीबॅग इतरत्र टाकून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर कचºयातदेखील कॅरीबॅग वाढत आहेत. च्इतरत्र फेकलेल्या कचºयाच्या माध्यमातून नदी, नाले, गटारे तुंबण्याचे प्रकार घडू शकतात. त्याचबरोबर पर्यावरणाची हानी करण्यास खतपाणी घालण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता महापालिकेकडून योग्य कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

महापालिका कर्मचारी कोविड १९ या कामात व्यस्त असल्यामुळे प्लास्टीक बंदी कारवाई थंडावली होती. पनवेल परिसरात भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांच्याकडून प्लास्टीक कॅरीबॅगचा वापर सुरू असेल तर पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.-जमीर लेंगरेकर उपायुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाpanvelपनवेल