शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांवरील कारवाईत पक्षपातीपणा

By admin | Updated: January 12, 2017 06:27 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणाच्या विरोधात कंबर कसली आहे.

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणाच्या विरोधात कंबर कसली आहे. त्याअंतर्गत पदपथावरील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र, फेरीवाल्यांवरील या कारवाईत महापालिकेकडून पक्षपातीपणा केला जात आहे. विनापरवाना फेरीवाल्यांना अभय देत परवानाधारक फेरीवाल्यांनाच लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नवी मुंबई लेबर युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी केला आहे. महापालिकेच्या या कारवाईच्या विरोधात २४ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.शहरातील बहुतांशी पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त मुंढे यांनी केला आहे. त्यानुसार २५ डिसेंबरपासून पुन्हा फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, असे असले तरी ही कारवाई करताना पक्षपातीपणाचे धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. या कारवाईअंतर्गत पदपथांवरील टेलिफोन बुथ, गटई कामगारांचे स्टॉल्स, ज्युस सेंटर, दूध सेंटर आदींकडे सोईस्करपणे डोळेझाक केली जात आहे. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसवरील मोकळ्या जागा विविध विक्रेत्यांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रेल्वे स्थानकाजवळील किओक्सच्या परिसरात मोठ्याप्रमाणात बेकायदा ठेले थाटले आहेत. वाशी सेक्टर १५ येथील अनधिकृत कपड्यांचा बाजार आजही सुरूच आहे. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही; परंतु अधिकृत परवाना असलेल्या फेरीवाल्यांवर मात्र कारवाई केली जात आहे. परवानाधारक फेरीवाले मागील २०-२५ वर्षांपासून नियमितपणे शुल्क भरून व्यवसाय करीत आहेत. (प्रतिनिधी)कारवाई दरम्यान  चार फेरीवाले जखमीस्टॉल्स किंवा वडापावच्या गाड्या उचलताना तेथील फेरीवाल्यांना काही दुखापत होईल, यासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नाही. या पथकाचे कर्मचारी अगदी अमानुषपणे फेरीवाल्यांच्या गाड्या उलथून लावतात. अशाच एका कारवाईदरम्यान कढईतील उकळते तेल अंगावर पडून चार फेरीवाले जखमी झाल्याची माहिती प्रफुल्ल म्हात्रे यांनी या वेळी दिली.