शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेकडून आरडीसी बँकेला अभय?

By admin | Updated: December 22, 2016 06:36 IST

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत पदपथावर व्यवसाय

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्र मण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत पदपथावर व्यवसाय करणारे फेरीवाले , दुकानदारांचे पत्राशेड हटवून पनवेलचा श्वास मोकळा करण्यात आला आहे. परंतु एमटीएनएनल रोडवरील आरडीसी बँकेने बाहेर मारलेले शेड, तसेच बाहेरच्या अतिक्रमणाला मात्र अभय देण्यात आले आहे. नियम सर्वांना सारखे आहेत की नाही, असा सवाल पनवेलकरांनी उपस्थित केला आहे.रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची पनवेलमध्ये एमडीएनएल रोडवर मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथे शाखा आहे. या बँकेने आपल्या शाखेसमोर अतिक्र मण केले आहे. त्यांनी बाहेरचा संपूर्ण पदपथ गिळंकृत केला आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी एटीएम मशिन बसविण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जनरेटर सुध्दा बाहेरच मांडले आहे त्यामुळे मोठी जागा व्यापली जाते. बँकेने बाहेर शेड सुध्दा टाकले आहे. पनवेल शहरातील अनेक ठिकाणी आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांनी मोहीम घेवून कारवाई केली. बाहेर ठेवलेल्या वस्तू, माल जप्त केला. खुद्द आयुक्तांनी मोहिमेचे नेतृत्व करून दुकानाबाहेरचे फलक, शेडवर हातोडा मारला. असे असताना संबंधित बँकेबाहेरच्या अतिक्र मणावर कारवाई करण्यात आली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बँकेच्या बाजूला सुध्दा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र आरडीसी बँकेला अभय देण्यात आले आहे. याबाबत पनवेलकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. डॉ. शिंदे यांनी काही दिवसातच पनवेलचा चेहरामोहरा बदलून टाकला असल्याने त्यांचे याबाबत अभिनंदन होत आहे. परंतु अतिक्र मण हटवताना दुजाभाव करू नये अशी अपेक्षा पनवेलकरांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)