पत्नीच्या हत्येनंतर पाकिस्तानच्या नागरिकानं संपवलं जीवन, नवी मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 08:35 IST2025-06-11T08:34:29+5:302025-06-11T08:35:06+5:30

Crime News: खारघरमध्ये चाकूने पत्नीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दोघेही मूळचे पाकिस्तानी असून, नोव्हेंबरमध्ये ते आपल्या दोन मुलांसह लाँग टर्म व्हिजिट व्हिसा मिळवून भारतात आले होते. 

Pakistani citizen ends life after killing his wife, incident in Navi Mumbai | पत्नीच्या हत्येनंतर पाकिस्तानच्या नागरिकानं संपवलं जीवन, नवी मुंबईतील घटना

पत्नीच्या हत्येनंतर पाकिस्तानच्या नागरिकानं संपवलं जीवन, नवी मुंबईतील घटना

नवीन पनवेल - खारघरमध्ये चाकूने पत्नीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दोघेही मूळचे पाकिस्तानी असून, नोव्हेंबरमध्ये ते आपल्या दोन मुलांसह लाँग टर्म व्हिजिट व्हिसा मिळवून भारतात आले होते. 

मृत महिलेचे नाव सपना नोतनदास (३५) आणि पतीचे नाव नोतनदास ऊर्फ संजय सचदेव (४६) असे आहे. दोघेही मागील सहा महिन्यांपासून खारघर, सेक्टर ३४ मधील डॉल्फिन प्राइड सोसायटीत भाडेतत्त्वावर वास्तव्यास होते. या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्हिसा कसा मिळाला?
मयत नोतनदास ऊर्फ संजय सचदेव हा नाेकरीच्या शोधात होता. यामुळे भारतात त्यास कोणतीही नोकरी नसताना दीर्घ मुदतीचा  व्हिसा  कसा मिळाला, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे त्याने तो घेतला, याबाबतचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान आता नवी मुंबई पोलिसांसमोर आहे.

Web Title: Pakistani citizen ends life after killing his wife, incident in Navi Mumbai