भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
सिडकोची स्थापना झाल्यापासून ४८ वर्षांमध्ये प्रथमच स्थानिक भूमिपुत्रांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असून, विमानतळासह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत सिडक ...
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या आदिवासींवर महापालिकेने कारवाई केली आहे. आश्वासन देऊनही नोकरीमध्ये समावेश करून घेतला जात नाही. या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासींनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले. ...
केरळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मंडळांनी यावर्षी दहीहंड्या रद्द केल्या, परंतु काही मंडळांनी आपली परंपरा कायम ठेवत यावेळी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचा वसा घेतला. ...
महानगरपालिका अग्निशमन दलामधील कर्मचा-यांना जादा कामासाठी अत्यंत कमी मोबदला मिळत होता. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी कर्मचा-यांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे. ...
राहण्यास योग्य शहरात नवी मुंबईचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. असे असले तरी सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की होत आहे. खड्डेमय महामार्गामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत आहे. ...
न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात दहीहंडी महोत्सवातील निरुत्साहाचे सावट जाणवले. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून उत्सव साजरा करता येत नसल्याने अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कित्येक वर्षांची परंपरा खंडित केली. ...