पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सीबीडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या चौघा पोलिसांचीही चाचणी घेण्यात आली असून होम क्वारंटाइन केले आहे. ...
काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून वायू, जलप्रदूषण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. केमिकल कंपनीतील सांडपाण्यामुळे परिसरात उग्र वास येत आहे. ...
नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे. ...
नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. नोकरी-व्यवसायासाठी हे शहर सोयीचे असल्याने येथे विविध प्रांतातील लोक वास्तव्यास आहेत. भाषा, प्रांत वेगवेगळे असले तरी सर्वांची कुटुंब रचना सारखीच आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे. ...
गुरुवारी सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून ठामपानेही नऊशेचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबईत ही ६४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. तर सर्वात कमी एक रुग्ण हा भिवंडीत आढळल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ६२७७ कंत्राटी कामगार काम करत आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईची कामगिरी उंचावण्यामध्ये या कामगारांचा मोठा वाटा आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून हे कंत्राटी कामगार दिवस-रात्र परिश्रम करत आहेत. ...
बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. मार्केटमध्ये दिवसरात्र परिश्रम घेणा-या फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांना ही पंधरा दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. ...
गुडवणवाडीमध्ये आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेलला चांगले पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई तेथे नाही. ...