coronavirus: अफवा पसरविणाऱ्यांवर पालिका आयुक्तांचा ‘वॉच’, कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:01 AM2020-05-16T03:01:43+5:302020-05-16T03:02:08+5:30

नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे.

coronavirus: Municipal Commissioner's 'watch' on those who spread rumors, warning of action | coronavirus: अफवा पसरविणाऱ्यांवर पालिका आयुक्तांचा ‘वॉच’, कारवाईचा इशारा

coronavirus: अफवा पसरविणाऱ्यांवर पालिका आयुक्तांचा ‘वॉच’, कारवाईचा इशारा

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या एक हजारपेक्षा जास्त झाली आहे. शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, या काळात काही जण मुद्दाम अफवा पसरविण्याचे काम करत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे. काही ठेकेदार व कामगार महापालिका व शहरास वेठीस धरण्याचे काम करत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईत १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महापालिकेने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली. महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविडमध्ये रूपांतर केले आहे. तीन खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात आली आहे. वाशी प्रदर्शन केंद्रामध्ये ११०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. याशिवाय १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून आणखी काही खरेदी केल्या जात आहेत.
शहरातून काही गैरसोयींविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी वेळेत औषध फवारणी होत नाही. इंडिया बुलमधील क्वारंटाइन केंद्रात सुविधा मिळत नाहीत. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाही. अशाप्रकारच्या तक्रारी आल्यानंतर त्यांची तत्काळ शहानिशा केली जात आहे. आयुक्तांनी इंडिया बुल इमारतीमध्ये स्वत: पाहणी केली असून काही त्रुटी असल्यास त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये काही घटक जाणिवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहेत. अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व दुकाने खुली करण्याचा महापालिकेचा निर्णय झाल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या आहेत. महापालिकेने तत्काळ या वृत्तांचे खंडन केले असून, अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका व इतर अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत; परंतु काही कर्मचारी व ठेकेदार पालिकेला व पर्यायाने शहरास वेठीस धरत आहेत. कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत. अशा कामचुकार ठेकेदार व कामगारांना नोटीस देणार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.

संशयास्पद मृत्यूचा अहवाल २४ तासांत मिळणार

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात संशयित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एक हजारपेक्षा जास्त अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवस विलंब होत आहे. संशयास्पद मृत्यू होणाºयांचा अहवालही उशिरा मिळतो.

या दिरंगाईमुळे कोरोना वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे यापुढे संशयास्पद मृत्यू होणाºयांची महापालिका स्वखर्चाने खासगी लॅबमधून तपासणी करून घेणार आहे. २४ तासांत अहवाल मिळवून पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. १७ रुग्णवाहिका उपलब्ध असून नवीन रुग्णवाहिका खरेदी
केल्या जात आहेत. प्रशासन सर्व उपाययोजना करत आहे. काही जण अफवा पसरवत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. कामचुकारपणा करणाºया ठेकेदारांवरही कारवाई केली जाणार आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
 

Web Title: coronavirus: Municipal Commissioner's 'watch' on those who spread rumors, warning of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.