coronavirus: तुर्भेत आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आल्याने चार पोलीस होम क्वारंटाइन  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 05:04 AM2020-05-16T05:04:53+5:302020-05-16T05:05:15+5:30

पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सीबीडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या चौघा पोलिसांचीही चाचणी घेण्यात आली असून होम क्वारंटाइन केले आहे.

coronavirus: Corona positive in Turbhet, four police home quarantine after contact | coronavirus: तुर्भेत आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आल्याने चार पोलीस होम क्वारंटाइन  

coronavirus: तुर्भेत आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आल्याने चार पोलीस होम क्वारंटाइन  

Next

सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सीबीडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या चौघा पोलिसांचीही चाचणी घेण्यात आली असून होम क्वारंटाइन केले आहे.
लॉकडाऊन असतानाही दुकान खुले ठेवून आॅनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय तुर्भे सेक्टर २१ येथे सुरु होता. ५ मे रोजी एपीएमसी पोलिस कारवाईसाठी गेले असता दांपत्याने पोलिसांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्या दोन लहान मुलांच्या संगोपनासाठी वडिलाला पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया करून सवलत देण्यात आली होती. ११ मे रोजी त्याला अटक केल्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. त्याला सीबीडीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
कोरोना पॉझिटीव्ह असल्यान जामीन द्यावा यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे शिफारस केली असता न्यायालयाने ती फेटाळली. यामुळे त्याच्यावर कोविड सेंटरमध्ये पाळत ठेवण्यासाठी बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. चौकशी निमित्ताने तसेच न्यायालयात घेऊन जाताना चार पोलीस त्याच्या सतत संपर्कात होते. त्यांचीही चाचणी घेण्यात आली असून होम कॉरंटाईन केले आहे.
 

Web Title: coronavirus: Corona positive in Turbhet, four police home quarantine after contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.