सिडकोने आपल्या अधिकार क्षेत्रात विविध सुविधांची पूर्तता केली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे आदी नागरी सुविधांचा यात समावेश आहे. ...
पनवेल पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाचे कशावरच नियंत्रण नसल्याने वेगवगेळ्या आस्थापनांच्या ठिकाणी सर्रास कोविडचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. ...
कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आस्थापना सील होणार आहेत. पोलीस विभाग आणि पालिकेचे कर्मचारी संयुक्तिकरित्या कारवाई करणार आहेत. ...
महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे. ...
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ...
पोलीस कारवाई काही प्रमाणात थंडावली आहे. परिमंडळ दोनमध्ये मोजक्याच ठिकाणी वाहनांची तपासणी होते. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार कार्यक्रम पार पडत आहेत का? याबाबत योग्य ती तपासणी करणारी यंत्रणाच नसल्याने पालिका क्षेत्रात कोविडचे नियम पायदळी तुडविण्या ...
गेल्यावर्षी मार्च महिन्यात नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांतच शहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर पोहोचली होती. ...
कोरोनाच्या काळात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी करंजाडे परिसरात कारवाई झाली. त्यानंतर, मंगळवारी कळंबोली येथे सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात करत, अनधिकृत अतिक्रमणावर सिडकोने हातोडा मारला. ...
नवी मुंबई शहरात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. परंतु स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर मात्र कमी झाला आहे. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती. ...