शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

महाडमध्ये पावसामुळे भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: October 4, 2016 02:48 IST

गेले दोन दिवस महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हळवी भात कापणीच्या स्थितीत असल्याने अनेक ठिकाणी पीक आडवे झाले आहे

दासगाव/महाड : गेले दोन दिवस महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हळवी भात कापणीच्या स्थितीत असल्याने अनेक ठिकाणी पीक आडवे झाले आहे. हाती आलेला घास जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्यावर्षी संपूर्ण राज्यात पाऊस कमी प्रमाणात होता. यामुळे अनेक ठिकाणी धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. महाड तालुक्यात बहुतेक गावांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा मात्र महाड तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी यावेळी २०९२ मि.मी. नोंद झाली होती तर यंदा ४१३१ मि.मी. एवढी दुप्पट नोंद झाली आहे. सध्या या पावसामुळे कापणीसाठी तयार झालेल्या हळवी भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पीक झोपले आहे. शेतामध्ये पाण्याच्या वहाळा वाहत आहेत. सध्या गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणात महाड तालुक्यात लागणाऱ्या पावसामुळे शेतकरी हादरून गेला आहे. हातातोंडाशी आलेले पीक जाण्याच्या मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त के ली.