शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दारातून आमची मुले परत आली...

By admin | Updated: December 9, 2015 01:00 IST

शाळेत जाण्याच्या वयात मुलांना हृदयरोग झाला. त्यांच्या आजाराच्या वेदना आम्हालाच जास्त होत होत्या. मोलमजूरी करून दोन वेळची भाकर मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत होती

नवी मुंबई : शाळेत जाण्याच्या वयात मुलांना हृदयरोग झाला. त्यांच्या आजाराच्या वेदना आम्हालाच जास्त होत होत्या. मोलमजूरी करून दोन वेळची भाकर मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत होती. उपचारासाठी लाखो रुपये कुठून आणायचे. आम्ही साऱ्या आशा सोडून दिल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय देवासारखे धावून आले व मोफत उपचार सुरू करून मुलांना मृत्यूच्या दारातून परत आणल्याच्या भावना सांगली जिल्ह्यातील पालकांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या वतीने ६५ मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या मुलांचा उपचाराचा व पालकांच्या राहण्याचा पूर्ण खर्च रुग्णालयाने उचलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: रुग्णालयात येऊन मुलांची आस्थेने चौकशी केली. सांगली जिल्ह्यामधील दुष्काळी स्थिती असणाऱ्या खेड्यांमध्ये लहान मुलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. शाळांमध्ये झालेल्या आरोग्य तपासणीमधून ६५ मुलांना हृदयाचे गंभीर आजार झाल्याचे निदर्शनास आले. खाजगी रुग्णालयांमध्ये मुलांची शस्त्रक्रिया करण्यासाठी २ ते ४ लाख रुपये खर्च सांगितला जात होता. या मुलांच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडीसेविका व गावात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या डॉक्टरांनी आम्हाला आधार दिला. आमची कैफियत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविली. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला विनंती करून पूर्णपणे मोफत उपचार सुरू केले. तासगाव तालुक्यातील छोट्या खेड्यात राहणाऱ्या चार वर्षांच्या ज्ञानेश्वरचे आजोबा मारुती मोरे यांनी सांगितले की एवढ्या छोट्या मुलाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्हाला धक्का बसला. परंतु मुख्यमंत्र्यांनी व रुग्णालयाच्या सहकार्याने आमच्या मुलावरील उपचार मार्गी लागले. अण्णासाहेब श्रीराम हा मिरज तालुक्यातील ८ वर्षांचा मुलगा. त्याचे चुलते प्रकाश श्रीराम त्याला घेऊन नेरूळच्या रुग्णालयात आले आहेत. आम्हाला विश्वास बसत नाही की आमच्या मुलांवर उपचार होत आहेत. मुख्यमंत्र्यांचे व आम्हाला येथे येण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मानावे तेवढे आभार कमीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या मुलांसाठी स्वतंत्र वार्ड तयार केला असून, नातेवाइकांच्या राहण्याचीही व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)