शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
2
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
3
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
4
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
5
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
6
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
7
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
8
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
9
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
10
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
11
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
12
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
13
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
14
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
15
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
16
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
17
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
18
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
19
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईकांच्या कोंडीचे महाविकास आघाडीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 06:13 IST

आजच्या शक्तिप्रदर्शनात भाजपला शह देण्याची व्यूहरचना

नवी मुंबई / मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेले गणेश यांचे राजकीय बलस्थान असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतच त्यांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेल्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाविकास आघाडीचा मंगळवारी वाशीत पहिला मेळावा होत असून यावेळी प्रचाराचा नारळ फोडताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्याला या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार राजन विचारे हेही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेतील सत्तेच्या आधारे गणेश नाईक यांचा तेथील राजकारणावर दीर्घकाळ दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी मागील महापालिकेवर आपली सत्ता अबाधीत ठेवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांसह भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आली.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यानंतर गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी नवी मुंबईतही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्याच्या हालचालींना वेग आला. त्याची सुरूवात म्हणून मंगळवारी आघाडीचा पहिला मेळावा वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे.९ मे २0२0 रोजी नवी मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत परस्परांविरोधात लढणाऱ्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत मनोमिलन व्हावे, यासाठी तसेच कार्यकर्त्यांत संवादासाठी या मेळाव्यातून प्रयत्न केले जातील.

शरद पवारांनी घेतला आढावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक घेऊन नवी मुंबई पालिका निवडणुकीबाबत नेमके काय करता येईल, यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. यावेळी शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे, तर काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तिन्ही नेत्यांच्या चर्चेत उद्याचा मेळावा, आघाडीचे स्वरूप, जागावाटप यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाSharad Pawarशरद पवारBJPभाजपा