शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

ऑपरेशन ऑल आऊट: खबरदारी न घेणाऱ्या ११०४ जणांवर कारवाई, मास्क न वापरणाऱ्या ६६९ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 02:26 IST

नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन ऑल आऊट राबवले जात आहे.

नवी मुंबई : कोरोनाच्या अनुषंघाने कसलीही खबरदारी न घेता बेजबाबदारपणे वावरणाऱ्यांवर महापालिका व पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार राबवले जात असलेल्या ऑपरेशन ऑल आऊटच्या पहिल्याच दिवशी ११०४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात मास्क न वापरणाऱ्या ६६९ जणांचा समावेश आहे. 

नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन ऑल आऊट राबवले जात आहे. या मोहिमेत ७००हून अधिक पोलीस, ७५ पालिका अधिकारी व पोलीस मित्र यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी कोणतीही खबरदारी न घेता वावरणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जात आहे. त्यानुसार ऑपरेशनच्या पहिल्याच दिवशी एकूण ११०४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

त्यात मास्क न वापरता अथवा अर्धवट मास्क लावून वावरणाऱ्या ६६९ जणांचा समावेश आहे. नवी मुंबईतली सर्वच पोलीस ठाणे हद्दीत अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुरेपूर खबरदारी घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना महापालिका व पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहेत. त्यानंतरही कारवाईला न जुमानता अनेक जण बेजबाबदारपणे वावरत आहेत. त्यामुळे ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून अशा व्यक्तींवर कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. त्यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ३४ आस्थापनांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर न राखणाऱ्या २६० जणांवर कारवाई झाली आहे. 

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. यामुळे पालिका व पोलीस संयुक्तरीत्या विशेष मोहीम राबवत आहेत. त्याअंतर्गत ११०४ जणांवर विविध कलमांतर्फे कारवाई केली आहे. यापुढेही कारवाईत सातत्य राहणार आहे. - सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका