शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिकेकडून गणेश मंडळांना आॅनलाइन परवानगी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:24 IST

पनवेलमधील गणेश मंडळांना परवानग्या मिळविण्यासाठी आता वारंवार खेटे घालण्याची गरज भासणार नाही. पनवेल महानगरपालिकेने मंडळांना परवानगी देण्यासाठी पोर्टल तयार केले असून आॅनलाइन अर्ज करून परवानगी मिळवता येणार आहे.

 पनवेल : पनवेलमधील गणेश मंडळांना परवानग्या मिळविण्यासाठी आता वारंवार खेटे घालण्याची गरज भासणार नाही. पनवेल महानगरपालिकेने मंडळांना परवानगी देण्यासाठी पोर्टल तयार केले असून आॅनलाइन अर्ज करून परवानगी मिळवता येणार आहे. यासंदर्भात पनवेल महापालिका कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आली.पनवेल महापालिका क्षेत्रातील गणेश मंडळांना गणेशोत्सवाची परवानगी घ्यायची असल्यास स्रूेूाी२३्र५ं’.ूङ्मे ही वेबसाइट विकसित केली आहे. यावर अर्ज करण्यासाठी आवश्यक ती माहिती मंडळाची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ही वेबसाइट लॉग इन करण्यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन, महावितरण यांना लॉग इन आयडी देण्यात आले आहेत. महापालिकेने आलेले अर्ज मंजूर केल्यानंतर अर्ज पुढील परवानग्यांसाठी पुढे पाठविण्यात येईल. त्यानंतर पोलीस, वाहतूक पोलीस जागेची पाहणी करून त्यांच्या विभागाचे मत त्या अर्जांवर आॅनलाइन मांडेल. सर्व विभागांनी आॅनलाइन प्रक्रि या पूर्ण केल्यानंतर महापालिका या अर्जांला अंतिम मंजुरी देणार आहे. ही सगळी प्रक्रि या ४ दिवसांत पूर्ण होईल असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. आॅनलाइन अर्ज करण्यास अडथळे येत असल्यास महापालिकेने आॅफलाइनची देखील सोय केली आहे. महापालिका मंडळाकडून डिपॉझिट म्हणून ५ हजार रुपये तर फी म्हणून १ हजार रुपये घेणार आहे. तसेच सरसकट बॅनर लावण्यास परवानगी मिळणार नसल्याचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.पालिकेच्या निर्णयाला उशीरगणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येवून ठेपला आहे. या उत्सवाचे आयोजन करणाºया गणेश मंडळांची महिनाभरापूर्वीच विविध परवानग्यासाठी धावपळ सुरू असते. अनेक मंडळांनी धावपळ करून परवानग्या देखील मिळविल्या आहेत तर काही मंडळांची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याने त्यांनी पालिके चा हा निर्णय चांगला आहे मात्र तो वेळेवर घेणे गरजेचे होते. यासंदर्भात पालिकेने अगोदर माहिती देणे देखील गरजेचे होते अशी प्रतिक्रिया खारघरमधील काही मंडळांच्या प्रतिनिधींनी दिली.