शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

एकाच दिवशी एनएमएमटीच्या दोन बसचे चाक निखळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:47 PM

जुईनगर रेल्वे स्थानकासमोर गुरुवारी सकाळी एनएमएमटी बसचे चाक निखळले.

नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकासमोर गुरुवारी सकाळी एनएमएमटी बसचे चाक निखळले. या अपघातामध्ये कोणी जखमी झाले नाही. खारघरमध्येही सायंकाळी एनएमएमटीच्या बसचे चाक निखळल्याची घटना घडली असून, याविषयी प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची बस एमएच ४३ एच ५२७३ जुुईनगर रेल्वे स्थानकासमोरून सानपाडा सेक्टर ११ मधून जाताना चालकाच्या बाजूचे पुढील चाक अचानक निखळले. बेरिंग तुटल्यामुळे ही घटना घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जानेवारीमध्ये बेरिंग बदलण्यात आली होती व ती ४५ हजार किलोमीटरपर्यंत चालणे अपेक्षित होते. अपघातग्रसत बस ३५ हजार किलोमीटरच चालली होती. गत आठवड्यामध्ये संपूर्ण बसची तपासणी करण्यात आली होती. यानंतरही रोडवर चाक निघाल्यामुळे कार्यशाळेत दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्याची टीकाही होत आहे. खारघरमध्ये गुरूवारी सायंकाळी एनएमएमटीच्या बसचे चाक निखळले. एकाच दिवशी दोन घटना घडल्याने या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.नेरुळ सेक्टर १० मध्ये चालू बसमधील डिझेल संपले होते. सेक्टर २८ मध्ये बसला लाग लागली होती. सानपाडामध्ये स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने बस दुभाजकावर गेली. जुईनगर रेल्वे मार्गावर लोकलला बसने धडक दिली होती. याविषयी आगरशाळेतील अधिकारी विवेक आचलकर यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.>खारघर उड्डाणपुलावर तीन वाहनांना अपघातखारघर हिरानंदानी उड्डाणपुलावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर गुरुवारी सकाळी तीन वाहनांना अपघात झाला. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले. मुंबईकडे जाणाºया एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने तीन कार एकमेकांवर आदळल्या. सकाळी ११.३० च्या सुमारास झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.>प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. बसची दुरुस्ती योग्यप्रकारे झाली पाहिजे.- समीर बागवान, सदस्य, परिवहन समिती