शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

कांदा-बटाटा मार्केट खाली करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:27 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक घोषित केले आहे. मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याचे फलक पालिकेने लावले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई  -  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक घोषित केले आहे. मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याचे फलक पालिकेने लावले आहेत. १५ वर्षांपासून व्यापारी, कामगार व ग्राहक जीव मुठीत धरून व्यवसाय करत आहेत. २५ हजार नागरिकांचा जीव धोक्यात असून, पुनर्बांधणीचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील ३७८ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या असून, त्यामध्ये कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे. राज्य शासनाने मुंबईमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बाजार समितीची पाच मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय ८०च्या दशकामध्ये घेतला. १९८१मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतर करण्यात आले. सिडकोने येथील पाचही मार्केटचे बांधकाम केले; पण बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याने २० वर्षांमध्ये मार्केट धोकादायक बनले. पिलरला तडे गेले. धक्क्यांची दुरवस्था झाली. छताचे प्लास्टर कोसळू लागले. मार्केटसमोरील सज्जा कोसळू लागला. वारंवार छताचा भाग कोसळू लागल्यामुळे मार्केटचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले व अखेर २००३मध्ये महापालिकेने काही विंग धोकादायक घोषित केल्या. संचालक मंडळाने पुनर्बांधणीचा निर्णय घेतला; पण व्यापारी संघटना न्यायालयात गेल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. अखेर २००५मध्ये न्यायालयाने एल आकारामध्ये मॉल उभारावा व उर्वरित जागेमध्ये व्यापाऱ्यांना मोफत मार्केट उभारून द्यावे, असे आदेश दिले होते; परंतु त्यानंतरही विविध अडथळ्यांमुळे मार्केटची पुनर्बांधणी रखडली असून, सद्यस्थितीमध्ये संचालक मंडळ नसल्याने न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रशासकीय मंडळाला मनाई केली आहे.महापालिकेने मार्केटचा वापर थांबविण्याची नोटीस बाजार समितीला व व्यापाºयांना दिली आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर फलक लावले आहेत. यामुळे व्यापाºयांमध्येही संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. मार्केट धोकादायक घोषित केल्यानंतर व्यापाºयांनी स्वखर्चाने गाळ्यांवर शेड टाकले आहे. माल ठेवायच्या जागेच्या वरील छत कोसळू नये, यासाठी लोखंडी खांबांचे टेकू देण्यात आले आहेत. आवश्यक तिथे प्लास्टरही केले आहे; परंतु संपूर्ण मार्केटचीच स्थिती बिकट झाली असून, टेकू लावायचे तरी कुठे व किती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना माथाडी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांचा वावर असलेल्या ठिकाणी छतामधील लोखंड दिसू लागले आहे. प्लास्टर वारंवार कोसळत आहे. अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली.कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी करण्याचे विचाराधीन आहे; परंतु प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. महापालिकेने अतिधोकादायक इमारतींमध्ये मार्केटचा समावेश केला असून, मार्केट खाली करण्याची नोटीस दिली आहे. ही बाब पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.- सतीश सोनी, मुख्य प्रशासक, बाजार समितीकांदा-बटाटामार्केटचा तपशीलक्षेत्रफळ ७.९२ हेक्टरएकूण गाळे २४३गाळ्यांचे क्षेत्रफळ ६७ चौ.मीलिलावगृह २५५० चौ.मीमध्यवर्ती इमारत ३९९६ चौ.मीरोजची वर्दळ २५ हजार

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या