एनएमएमटी घणसोली डेपोबाहेर खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:50 IST2018-08-23T01:50:01+5:302018-08-23T01:50:29+5:30
खड्ड्यांमुळे बसेसचे नुकसान होऊ लागले आहे.

एनएमएमटी घणसोली डेपोबाहेर खड्डे
नवी मुंबई : एनएमएमटी घणसोली डेपोच्या प्रवेशद्वारासमोरील रोडवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे बसेसचेही नुकसान होऊ लागले आहे. एनएमएमटीच्या घणसोली डेपोचे व्यवस्थापन महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट कंपनीला दिले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविषयी टीका होत असताना, आता डेपोबाहेरील खड्ड्यांचा विषयही ऐरणीवर आला आहे. डेपोच्या समोर दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस सुरू असला की, बसेस खड्ड्यांमध्ये आदळत आहेत. या रोडवर जाणाऱ्या इतर वाहनांनाही याचा फटका बसत आहे.
शिवसेनेचे परिवहन समिती सदस्य समीर बागवान यांनी डेपोसमोरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.