नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 06:03 IST2025-09-25T06:03:23+5:302025-09-25T06:03:53+5:30
या मार्गिकेतून अवघ्या ३० मिनीटांत दोन्ही विमानतळे गाठता येतील. अंदाजे ३५ किमीची ही मार्गिका भूमिगत तसेच उन्नत असणार आहे

नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
नवी मुंबई - सिडको छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारी गोल्डन मेट्रो मार्गिका क्रमांक ८ उभारणार आहे.
या मेट्रो मार्गिकेचे बांधकाम आणि संचालनाचा आढावा तसेच अंमलबजावणी आणि डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी सिडको सल्लागाराच्या शोधात असून त्याअनुषंगाने निविदाही जारी करण्यात आली आहे. ही मार्गिका कमी थांब्यांमुळे विमानतळ एक्स्प्रेस मार्गिका म्हणून विकसित केली जाण्याची अपेक्षा आहे. या मार्गिकेतून अवघ्या ३० मिनीटांत दोन्ही विमानतळे गाठता येतील. अंदाजे ३५ किमीची ही मार्गिका भूमिगत तसेच उन्नत असणार आहे. यात ९.२५ किलोमीटर भुयारी आणि २५.६३ किलोमीटर उन्नत मार्गाचा समावेश आहे.
असा असेल नवीन मार्ग
हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पासून सुरू होईल
छेडानगरपर्यंत भुयारी असेल आणि त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग असेल.
या मार्गावर कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, वाशी, नेरूळ आणि बेलापूर अशी महत्वाची ठिकाणे असतील.
पीपीपी तत्त्वावर मार्गिकेचे बांधकाम
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी)वर विकसित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन पूर्ण केल्यानंतर, या मार्गिकेच्या संरेखनात काही बदल होऊ शकतात. दाखल गुन्ह्यात नस्ली वाडिया यांच्यासह मौरीन नस्ली वाडिया (७८), नेस नस्ली वाडिया (५४), जहांगीर ऊर्फ जेह नस्ली वाडिया (५२), एच. जे. बामजी (७५), के. एफ. भारुचा आणि आर. ई. वंदेवाला (६५) यांच्या नावांचा समावेश आहे.
मेट्रो ८ चा खर्च १५ हजार कोटी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने हा १५ हजार कोटींचा मार्ग उभारला जाणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा पहिला मेट्रो मार्ग असणार असल्याने तो जलद गतीने बांधण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर २०२६ च्या मध्यापासून बांधकामास सुरुवात करून २०२८ च्या अखेरीस ते पूर्ण होण्याचा अंदाज आहे.