नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:27 IST2025-12-05T11:10:38+5:302025-12-05T11:27:26+5:30
नवी मुंबईकरांसाठी केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिले आहे. आता नेरुळ -उरण आणि बेलापूर -उरण पर्यंत फेऱ्या वाढवल्या आहेत, याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक्सवर दिली.

नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
आज राज्यातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. मागील वर्षी याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईकरांसाठी एक मोठी अपडेट दिली आहे. आता बेलापूर आणि नेरुळमधून उरणला जाण्यासाठी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही माहिती फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली.
मागील अनेक दिवसांपासून उरण येथील नागरिकांनी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीला आता यश आले आहे. आता नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर करण्यात आले आहेत.
"मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी माझ्या निवेदनाला मान देत, नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू केल्याबद्दल तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार! या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
A special gift for Mumbaikars!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2025
Thank you, Hon. PM Narendra Modi Ji, and Hon. Union Minister Ashwini Vaishnaw ji, for initiating additional local train services: Nerul–Uran–Nerul (4 trips) and Belapur–Uran–Belapur (6 trips), in response to my request. Grateful for the approval of… pic.twitter.com/Ia5joBrAGI