शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व, शिवसेनेचा पराभव; भाजपाचाही सेनेला धक्का; काँगे्रसमधील फूट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:31 IST

राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेण्याची वल्गना करणा-या शिवसेनेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्ज भरताना तटस्थ राहून व मतदानावर बहिष्कार टाकून भाजपानेही सेनेला धक्का दिला

नामदेव मोरेनवी मुंबई : राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेण्याची वल्गना करणा-या शिवसेनेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्ज भरताना तटस्थ राहून व मतदानावर बहिष्कार टाकून भाजपानेही सेनेला धक्का दिला. अडीच वर्षे किंगमेकर राहिलेल्या काँगे्रसला उपमहापौरपद मिळाले असले तरी पक्षातील बंडखोरी थांबविण्यास पक्षश्रेष्ठींना अपयश आले. गणेश नाईक यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.नवी मुंबई महापालिकेवर पुढील महापौर शिवसेनेचाच असा विश्वास युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली होती. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना उमेदवारी देवून राष्ट्रवादीचे जवळपास १२ नगरसेवक फोडण्याची तयारी केली होती. दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीचे किती व कोण नगरसेवक फोडले याविषयी शिवसेना नेते जाहीर वल्गना करू लागले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडायची, भाजपाचे सहा, अपक्ष व काँगे्रसच्या दहा नगरसेवकांच्या मतांवर पालिकेवर सत्ता मिळविण्याची रणनीती आखली होती. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना जबर धक्का देण्याचा संकल्प अनेकांनी केला. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांनी मात्र निवडणुकीपर्यंत शांत असल्याचे दाखवून राजकीय डावपेचामध्ये एकाच वेळी सर्व विरोधकांचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. पहिल्यांदा महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही थेट मदत घेण्यात आली. पवार यांनी राजकीय वजन वापरल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आघाडी कायम ठेवली व भाजपाने तटस्थ राहून राष्ट्रवादीचा विजय सुकर केला. मुख्यमंत्र्यांनी स्वत: विजय चौगुले यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.निवडणुकीपूर्वी दोन महिने राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडणार असल्याचे बोलले जात होते. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे एकही मत फुटले नाही. पाचही अपक्ष त्यांच्यासोबत राहिले. महापौर पदाच्या उमेदवाराला काँगे्रसच्याही सर्व दहा नगरसेवकांनी मतदान केले. दुसरीकडे उपमहापौर पदासाठी काँगे्रसमध्येच बंडखोरी झाली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यांना फक्त तीन मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाने निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. या निवडणुकीमध्ये काँगे्रस, भाजपा व शिवसेना सर्वच पक्षांवर राजकीय मात करण्यात राष्ट्रवादीचे नेते यशस्वी झाले आहेत. नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.शिवसेनेचा शेवटपर्यंत संभ्रमपालिकेवर भगवा फडकविण्याच्या वल्गना करणाºया शिवसेनेला दणदणीत पराभवास सामोरे जावे लागले. विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करून भाजपानेही सेनेची कोंडी केली. उपमहापौरपदासाठी माघार घेवून काँगे्रस बंडखोरांना पाठिंबा द्यायचा का याविषयी निर्णयही शेवटच्या क्षणापर्यंत होवू शकला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे शेवटपर्यंत नगरसेवकांच्या संपर्कात होते. परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने अखेर महापौरपदासाठी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.मुख्यालयाबाहेर जल्लोषनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आल्याने याचा आनंद याठिकाणी साजरा करण्यात आला. महापौर आणि उपमहापौर पदाच्या विजयी उमेदवारांची घोषणा करताच शुभचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.राष्ट्रवादीचा ड्रेसकोडराष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाºयांनी एका रंगाच्या साड्या आणि फेटे तर नगरसेवकांनी फेटे परिधान केले होते. विजयाच्या आत्मविश्वासानेच पक्षाच्या पदाधिकाºयांनी पूर्वतयारी केल्याचे पाहायला मिळाले. विजयाचे चिन्ह दाखवतच या पदाधिकाºयांनी मुख्यालयात प्रवेश केला.मोबाइलवर नेत्यांशी संपर्कमहापौर व उपमहापौर निवडणुकीदरम्यान सभागृहात मोबाइलचा वापर करण्यास बंदी घालणे आवश्यक होते. जुन्या मुख्यालयामध्ये जामर बसविण्यात येत होता. परंतु तशाप्रकारे काहीही उपाययोजना नसल्याने निवडणुकीदरम्यान बिनधास्तपणे नगरसेवक मोबाइलवर नेत्यांशी संपर्क साधत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.विरोधकांकडूनशुभेच्छाही नाहीतनिवडणुकीसाठीचे मतदान झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी तत्काळ सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यासाठीही विरोधक थांबले नाहीत. यामुळे प्रेक्षागृहातील उपस्थितांनीही नाराजी व्यक्त केली.अनुभवी महापौरमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांची निवड झाली. १९९५ पासून चार वेळा ते महापालिकेवर निवडून आले आहेत. सर्वाधिक वेळा सभागृह नेते म्हणून त्यांनी काम पाहिले असून एकवेळ स्थायी समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. गणेश नाईक यांचे विश्वासू ज्येष्ठ नगरसेवक असल्यामुळेच महापौर पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.१९९५ पासूनचेमहापौरसंजीव गणेश नाईकसुषमा प्रमोद दंडेदशरथ तथा चंदू राणेविजया विनायक म्हात्रेतुकाराम रामचंद्र नाईकसंजीव गणेश नाईकसंजीव गणेश नाईकमनीषा शशिकांत भोईरअंजनी प्रभाकर भोईरसागर ज्ञानेश्वर नाईकसुधाकर संभाजी सोनावणेउपमहापौरसुलोचना महादेव पाडळेसावित्री रामनाथ पाटीलगोपीनाथ शंकर ठाकूरमाधुरी मधुकर परबभोलानाथ रामदास पाटीलअनिल कौशिकरमाकांत नारायण म्हात्रेभरत सहादू नखातेशशिकांत बिराजदारभरत सहादू नखातेअशोक अंकुश गावडेअविनाश शांताराम लाड 

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसShiv Senaशिवसेना