पनवेलमध्ये पेट्रोल-डिझेल भाववाढी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसची निदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 15:34 IST2021-01-11T15:33:46+5:302021-01-11T15:34:18+5:30

petrol & diesel price hike : कोरोना संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार देखील वाढू लागला आहे.

NCP protests against petrol and diesel price hike in Panvel | पनवेलमध्ये पेट्रोल-डिझेल भाववाढी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसची निदर्शन

पनवेलमध्ये पेट्रोल-डिझेल भाववाढी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसची निदर्शन

पनवेल - पेट्रोल ,डिझेलच्या वाढत्या भाववाढीविरोधात नाराजी पसरत असताना पनवेल राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात खारघर येथे दि.11 रोजी निषेध आंदोलन छेडण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येऊन मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली .

कोरोना संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार देखील वाढू लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही.मुंबईसह राज्यातील अन्य भागांसह
देशातही पेट्रोलचे भाव नव्वदी तर डिझेलचे दर ऐंशी पार गेले आहेत. सरकार फक्त मोठ-मोठ्या घोषणा करत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नसल्याचे सांगत अच्छे दिनाच्या नावाखाली मोदी सरकारचे जनतेला लुटण्याचे एक कलमी कार्यक्रम सुरूच असल्याचे युवती कॉग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरोधात हाताने दुचाकीला धक्का मारत या इंधन दरवाढीचा निषेध केला.

यावेळी उपस्थितांमध्ये अल्पसंख्याक सेल राष्ट्रीय उपाध्यक्ष फारुक पटेल,जिल्हासरचिटणीस रणजीत नरुटे, राकेश थोरात,तुषार मानकर,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष विजयमयेकर,खारघर शहर ओबीसी सेल अध्यक्ष नरेश पाटील,कल्पेश मयेकर,ओंकार भोसले,तुकाराम भगत,गणेश शितोळे,राजश्री कदम,युवती जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई चव्हाण,नेहा ताई पाटील,हारून लोहार,चांद शेख,विजय भोसले,फरहान गोलंदाज,प्रणय परब व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: NCP protests against petrol and diesel price hike in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.