बॉम्बस्फोटाशी संबंध जोडून कळंबोलीत वृद्धाचे दीड कोटी हडपले; सलग तीन दिवस मानसिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 07:46 IST2026-04-03T07:46:05+5:302026-04-03T07:46:05+5:30

निर्दोष प्रमाणपत्रासाठी पाठवले पोलिस ठाण्यात 

Navi Mumbai Senior Citizen Duped of 1.5 Crore in Digital Arrest Scam Linked to Fake Terror Charges | बॉम्बस्फोटाशी संबंध जोडून कळंबोलीत वृद्धाचे दीड कोटी हडपले; सलग तीन दिवस मानसिक छळ

बॉम्बस्फोटाशी संबंध जोडून कळंबोलीत वृद्धाचे दीड कोटी हडपले; सलग तीन दिवस मानसिक छळ

नवी मुंबई : दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत संबंध असल्याचा आरोप करून डिजिटल अरेस्टच्या बहाण्याने वृद्धाचे दीड कोटी लुटल्याची घटना कळंबोलीत उघडकीस आली आहे. आरोपींनी तीन दिवस व्हिडीओ कॉल सुरू ठेवून त्यांचा मानसिक छळ केला. या प्रकरणी बुधवारी रात्री सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल अरेस्ट या प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या संकल्पनेचा वापर करून सायबर गुन्हेगार अनेकांची फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारातून कळंबोलीत राहणाऱ्या वृद्धाची १ कोटी ५४ लाखांची फसवणूक झाली आहे. २३ मार्चला त्यांना व्हिडीओ कॉल आला होता. त्यामधील व्यक्तीने तो एटीएस दिल्लीचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने गतवर्षी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीने वृद्धाचे सिमकार्ड वापरून बैंक खाते उघडून अडीच कोटी रुपये घेतले असल्याचा आरोप केला.

निर्दोष प्रमाणपत्रासाठी पाठवले पोलिस ठाण्यात 

चौकशीच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्यातील १ कोटी ५४ लाख रुपये संबंधितांनी एका खात्यावर घेतले. त्यानंतर ३१ मार्चला त्यांना पनवेल पोलिस ठाण्यात जाऊन निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र घेण्यास सांगितले. त्यावरून पीडित व्यक्ती पोलिस ठाण्यात गेले असता पुन्हा त्यांना कॉल करून पत्र घरी पाठवतो, सांगून पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले होते.
 

Web Title : कलंबोली: बम धमाके से जोड़कर बुजुर्ग से ₹1.5 करोड़ ठगे.

Web Summary : कलंबोली में एक बुजुर्ग को दिल्ली एटीएस बताकर साइबर अपराधियों ने बम धमाकों से संबंध का आरोप लगाया और 'डिजिटल अरेस्ट' के बहाने ₹1.5 करोड़ ठग लिए, जिससे उन्हें मानसिक पीड़ा हुई।

Web Title : Kalamboli: Elderly man loses ₹1.5 crore in bomb blast link scam.

Web Summary : Kalamboli resident lost ₹1.5 crore to cybercriminals posing as Delhi ATS. They falsely accused him of bomb blast links and extorted money via 'digital arrest,' causing mental distress.