नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 00:39 IST2025-12-21T00:38:51+5:302025-12-21T00:39:42+5:30
Sanjay Naik joins BJP Navi Mumbai: विधानसभेला तिकीट न मिळाल्याने भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केलेला प्रवेश

नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
Sanjay Naik joins BJP Navi Mumbai: महाराष्ट्रात मुंबई आणि ठाणे महापालिकेएवढीच नवी मुंबई महापालिकाही महत्त्वाची मानली जाते. या क्षेत्रातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) यांची अखेर घरवापसी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांनी भाजप प्रवेश केला. संदीप नाईक यांच्या घरवापसीमुळे गणेश नाईकांची आणि भाजपाची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे.
संदीप नाईक पुन्हा भाजपावासी
शनिवारी संदीप नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. संदीप नाईक, संजीव नाईक आणि सागर नाईक यांनी दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळ संदीप नाईक हे भाजप प्रवेश करणार अशा तुफान चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात होता. अखेर आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
आज भारतीय जनता पक्षात पुन्हा स्वगृही प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यानंतर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
— Sandeep Naik (@isandeepgnaik) December 20, 2025
माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास नेहमीच जनहित आणि नवी… pic.twitter.com/ukNW9f0O9I
विधानसभेत केलेली बंडखोरी
विधानसभा निवडणुकांच्या वेळी नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक भाजपाकडून लढण्यासाठी आग्रही होते. पण भाजपाने त्या क्षेत्रात आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट दिले. त्यामुळे संदीप नाईक यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. गणेश नाईक यांची शिष्टाईदेखील त्यांना रोखू शकली नव्हती. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवले होते. पण अखेर मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचा पराभव केला होता.
भाजपची ताकद वाढली, पण अंतर्गत धुसफूस
संदीप नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) मध्ये सामील होण्यासाठी पक्ष सोडून गेलेले नवी मुंबई भाजपचे २८ माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात परतले. त्यामुळे भाजपाला बळ मिळाले आहे. पण पक्षातील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.