Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 09:42 IST2025-06-10T09:41:39+5:302025-06-10T09:42:44+5:30

Navi Mumbai Murder and Suicide: नवी मुंबईतील खारघरमध्ये काल (९ जून २०२५) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली

Navi Mumbai Man Kills wife, ends life in Kharghar | Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या

Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या

नवी मुंबईतील खारघरमध्ये काल (९ जून २०२५) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली. खारघर येथील सेक्टर ३४ मध्ये भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दाम्पत्य मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली.  तपासादरम्यान, पोलिसांना दाम्पत्याच्या शरिरावर गंभीर जखमा आढळून आल्या. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली, अशी शक्यता वर्तवण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नोतानदास उर्फ ​​संजय सचदेव (वय, ४५) आणि सपना सचदेव अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सचदेव दाम्पत्य पाकिस्तानातील सिंधी नागरिक आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये दीर्घकालीन व्हिजिट व्हिसावर भारतात आले. तसेच गेल्या सहा महिन्यापासून नवी मुंबईतील खारखरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होते. स्वत:चा व्यवसाय सुरू न करू शकल्याने नोतानदार तणावात होता, अशी माहिती आहे. 

सपनाच्या बहिणीने खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोतानदास हा रागीट स्वभावाचा होता. त्यांच्यात नेहमीच भांडण होत राहायची. नोतनदास सपनाला मारहाण देखील करायचा. सपनाच्या नातेवाईकांनी तिला नोतानदासविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. पण सपनाने नकार दिला. परंतु, शारीरिक छळ वाढल्याने अखेर सपनाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

सचदेव दाम्पत्याला १० आणि सहा वर्षांची दोन मुले होती. घटनेच्या दिवशी त्यांचा मोठा मुलगा शाळेत गेला होता. तर, धाकटा मुलगा घराबाहेर खेळत होता. घरी परतल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मुलाने जवळच राहणाऱ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेला आणि हा प्रकार सांगितला. त्यानंतर शेजारी राहणारी एक व्यक्ती बाल्कनीतून घरात घुसला. त्यावेळी घरातील बाथरूमच्या शेजारी नोतानदास आणि सपना यांचे रक्ताने माखलेले मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सपनाच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर जखमा आढळून आल्या. तर, नोतानदासच्या मानेवर जखमा आढळून आल्या. नोतानदासने सपनाची हत्या केल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३(१) अंतर्गत नोतानदासविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला. 

Web Title: Navi Mumbai Man Kills wife, ends life in Kharghar