Navi Mumbai BJP continues to leak; Corporator in Juinagar in NCP | नवी मुंबई भाजपात गळती सुरूच; जुईनगरमधील नगरसेविका राष्ट्रवादीमध्ये

नवी मुंबई भाजपात गळती सुरूच; जुईनगरमधील नगरसेविका राष्ट्रवादीमध्ये

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये गळती सुरू झाली आहे. सोमवारी जुईनगरमधील नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून आतापर्यंत १४ माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आमदार गणेश नाईक यांचे पालिकेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. सुरुवातीला शिवसेना व नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून नाईकांनी महानगरपालिकेची सत्ता मिळविली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला असून महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुका जवळ आल्यापासून भाजपमधील नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये जाण्यास सुुरुवात झाली आहे. आतापर्यंत १३ जणांनी पक्ष सोडला आहे. सोमवारी जुईनगर प्रभाग ८३च्या नगरसेविका तनुजा मढवी यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला अजून एक धक्का बसला आहे. भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये दाखल होत असून ही गळती थांबविण्याचे आव्हान गणेश नाईक यांच्या समोर उभे राहिले आहे.

Web Title: Navi Mumbai BJP continues to leak; Corporator in Juinagar in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.