शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

‘नाला व्हिजन’साठी ७०० कोटींचा निधी अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:06 IST

शहरातील मोठ्या नाल्यांचा जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित विकास करण्याची योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने पालिकेचा हा प्रकल्प नाकारला आहे.

नामदेव मोरे ।नवी मुंबई : शहरातील मोठ्या नाल्यांचा जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित विकास करण्याची योजना बारगळली आहे. केंद्र सरकारने पालिकेचा हा प्रकल्प नाकारला आहे. ७४ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचा विकास करण्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. निधीअभावी एकत्रित विकास न करता प्राधान्यक्रम ठरवून नाल्यांची डागडुजी करावी लागणार आहे.दिघा ते बेलापूरपर्यंत पसरलेल्या डोंगररांगांवरून येणारे पावसाचे पाणी दहा प्रमुख व २९ उपनाल्यांमधून खाडीकडे जाते. शहरात ७४ किलोमीटर लांबीचे नैसर्गिक नाले आहेत. दिघा, चिंचपाडा, विष्णूनगर, इंदिरानगर, नेरूळ,राबाडा व इतर अनेक ठिकाणी नाल्याच्या कडेला लोकवस्ती झाली आहे. २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये नाल्यांमधील पाणी वस्तीमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती. १२ वर्षांपासून सर्वपक्षीय नगरसेवक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. नागरिक व सामाजिक कार्यकर्तेही याविषयी वारंवार पाठपुरावा करत आहेत. परंतु महापालिका प्रशासनातर्फे जेएनएनयूआरएमअंतर्गत एकत्रित नाला व्हिजन राबविण्यात येणार आहे. याविषयी केंद्र शासनाला प्रस्ताव दिला असून त्याला मंजुरी दिल्यानंतर संरक्षण भिंत व सुशोभीकरणाची कामे केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. केंद्र शासनाला याविषयी आराखडाही सादर करण्यात आला होता. स्थायी समिती, प्रभाग समिती व सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी नगरसेवकांनी आवाज उठविला की जेएनएनयूआरएमचे नाव सांगून सर्वांना गप्प करण्यात येत होते. परंतु जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये बहादूर बिष्ट यांनी चिंचपाडा येथील नाल्याला संरक्षण भिंत बांधली नाही तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तत्काळ याविषयी कार्यवाही करण्याची मागणी केली होती. शहर अभियंता मोहन डगावकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, जेएनएनयूआरएमअंतर्गत दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. यामुळे भविष्यात गरज पाहून व अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे कामे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.औद्योगिक वसाहतीमधील येणाºया नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. अनेक ठिकाणी उद्योजकांनी त्यांच्या सुविधेसाठी नाल्यांचा प्रवाह बदलला आहे. नाल्यांमध्ये डेब्रिज टाकून त्यांचा आकार कमी करण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे. नाल्याला लागून झोपड्यांचे बांधकाम झाले आहे. या सर्र्वांमुळे मोठ्या नाल्यांचा आकार कमी होत आहे. शहरामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्यास चिंचपाडासह इतर अनेक ठिकाणी लोकवस्तीमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून प्रशासनाने आवश्यकतेप्रमाणे नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.