पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळ 29 वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:21 IST2023-08-08T11:20:21+5:302023-08-08T11:21:01+5:30
पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का झोपडपट्टी जवळ विकी गोपाळ चंडालिया (वय 29, बिगारी काम) या इसमाची अज्ञाताने हत्या केली.

पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळ 29 वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल
मयुर तांबडे -
पनवेल : पनवेल शहरातील रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का या ठिकाणी 29 वर्षीय तरुणाची अज्ञाताने हत्या केली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का झोपडपट्टी जवळ विकी गोपाळ चंडालिया (वय 29, बिगारी काम) या इसमाची अज्ञाताने हत्या केली. याची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.