शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

इमारतीवर पत्र्यांचे शेड : गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:50 IST

NMMC News : पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखली जावी, यासाठी नवी मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतींवर पत्र्याचे शेड लावले आहेत. परंतु, शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्याचे कारण देत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. 

नवी मुंबई -  पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखली जावी, यासाठी नवी मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतींवर पत्र्याचे शेड लावले आहेत. परंतु, शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्याचे कारण देत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. प्रत्यक्ष कारवाई न करता सोसायटीतील पदाधिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेवून प्रकरण मिटविले जात आहे. मागील काही दिवसांपासून असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाच्या विरोधात नागरिकांत असंतोष आहे.सिडकोने बांधलेल्या इमारती अल्पावधीतच मोडकळीस आल्या आहेत. धोकादायक ठरलेल्या या इमारतीतून हजारो रहिवासी जीव मुठीत घेवून राहत आहेत. पावसाळ्यात अनेक इमारतींच्या भिंतीतून पाण्याचा झरा वाहताना दिसतो. या पार्श्वभूमीवर अनेक इमारतींच्या छतावर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. ऊन व पावसापासून इमारतीचे संरक्षण करणे हाच यामागचा हेतू आहे. परंतु, महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी विविध कारणे पुढे करून इमारतीतील रहिवाशांना वेठीस धरताना दिसत आहेत. पावसाळ्यात गळती रोखण्याबरोबरच इमारतीवरील पत्रे इतर वेळी सोसायटीच्या विविध कारणांसाठी उपयुक्त ठरतात. मात्र, महापालिका अधिनियमानुसार आणि न्यायालयांनी दिलेल्या आदेशानुसार हे पत्र बेकायदा ठरविले जात आहेत. नागरिकांच्या तक्रारीमुळे पत्र्याची शेड बेकायदा ठरवून काढण्यासाठी नोटीस दिली जाते. पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात सरसकट सर्वच इमारतींवरील पत्र्यांचे छत अनधिकृत ठरवून त्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर ही कारवाई स्थगित केली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून अशा शेडसना पुन्हा नोटिसा पाठविल्या जात आहेत. त्यामुळे रहिवाशांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.भूमिकेविषयी नागरिकांना संशयनोटिसा बजावणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेविषयीसुध्दा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. कारण, नोटीस बजावल्यानंतर महापालिकेचे संबंधित अधिकारी लगेच इमारतीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून कारवाई टाळण्यासाठी आर्थिक तडजोड केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNavi Mumbaiनवी मुंबई