शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

नॉनकोविड रुग्णांना पालिका रुग्णालयाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:37 AM

गंभीर आजार असणारांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेत मनपाचे प्रथम संदर्भ रुग्णालय बंद असल्यामुळे नॉनकोविड रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली होती; परंतु सद्य:स्थितीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्यांना उपचार देता येत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांचाही पुरेसा पर्याय उपलब्ध आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. पहिल्या लाटेत अनेक खासगी रुग्णालये बंद होती. मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचेही डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले होते. सद्य:स्थितीमध्ये रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू आहे. तर, २९ खासगी कोविड वगळता इतर खासगी हॉस्पिटल सुरू असल्याने आरोग्य सुविधा देणे शक्य होत आहे. भविष्यात रुग्ण वाढले तरी गंभीर अजार वगळता इतर शस्त्रक्रिया थांबविण्याची शक्यता आहे.

परत जावे लागत नाहीशहरातील कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात ३०० बेडची सोय आहे. तेथे २०० रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ओपीडीमध्ये प्रतिदिन १ हजार ते १,२०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयेही पुरेशा प्रमाणात सुरू आहेत. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्यांना परत जावे लागत नाही. अपवादप्रसंगी काही रुग्णालयांमध्ये जागा नसल्यास इतर रुग्णालयांत जावे लागत आहे. फारसी गैरसोय होत नाही.

सद्य:स्थितीमध्ये पुरेसी सुविधाशहरात सद्य:स्थितीमध्ये कोरोनाव्यतिरिक्त आजारांसाठी पुरेशी सुविधा आहे. मनपा व खासगी रुग्णालये सुरू आहेत; पण कोरोना रुग्णांची वाढ सुरूच राहिली, तर भविष्यात हृदयरोग, कँसर व महत्त्वाचे अजार वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

२९ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचारकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांचाही आधार घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील २९ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार केले जात आहेत. डॉ. डी.वाय. पाटील व एमजीएम रुग्णालयामध्ये मनपाचे रुग्णही संदर्भित केले जात आहेत. आयसीयू व व्हेंटिलेटर्ससाठी खासगी रुग्णालयांचा आधार घेतला जात आहे. अनेक प्रमुख रुग्णालयांमध्ये कोरोनाबरोबर इतर आजारांवरही उपचार केले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या