महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा १६ हजारांचा बोनस
By Admin | Updated: October 6, 2016 03:57 IST2016-10-06T03:57:15+5:302016-10-06T03:57:15+5:30
महापालिका कर्मचाऱ्यांसाठी स्थायी समितीने १६ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले असून कंत्राटी कामगारांना ८५०० रुपये दिले जाणार आहेत

महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा १६ हजारांचा बोनस
नवी मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी स्थायी समितीने १६ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले असून कंत्राटी कामगारांना ८५०० रुपये दिले जाणार आहेत. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर सर्वसाधारण सभेमध्ये किती वाढ होणार याकडे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुगृह अनुदान देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. प्रशासनाने कायम कामगारांसाठी १५ हजार व कंत्राटी कामगारांसाठी ८ हजार रुपये प्रस्तावित केले होते. स्थायी समिती सदस्यांनी यामध्ये वाढ करण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांनी करवसुली मोठ्याप्रमाणात केली आहे. पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनाही चांगला बोनस देण्यात यावा, असे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. एम. के. मढवी, अशोक गुरखे, दीपक पवार, मीरा पाटील व इतर सर्वच नगरसेवकांनी याविषयी भूमिका मांडली. कायम कामगारांसाठी १६ हजार व कंत्राटी कामगारांसाठी ८५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. (प्रतिनिधी)