कोपरखैरणेत बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई
By योगेश पिंगळे | Updated: January 20, 2024 15:40 IST2024-01-20T15:40:19+5:302024-01-20T15:40:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत सेक्टर १८ येथील अहिरे सुमंत सोपान, एसएस ...

कोपरखैरणेत बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत सेक्टर १८ येथील अहिरे सुमंत सोपान, एसएस टाईप, रूम नंबर ४९०, सुप्रिया महेश इंदुलकर व महेश अरुण इंदुलकर एसएस टाईप, रूम नंबर ४९१, भीमराव शिवाजी काळे व अनिता भीमराव काळे, एसएस टाईप, रूम नंबर ४८९, यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली होती.
त्यांनी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या पोटमाळ्याचे बांधकाम केले होते. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून त्यांच्यामार्फत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचा पोलीस बंदोबस्त तसेच, ६ मजूर , १ पिकअप व्हॅन, २ इलेक्ट्रॉनिक हॅमर , १ गॅस कटर इत्यादीचा वापर करण्यात आला. शहरात यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.