प्राची सोनवणे।नवी मुंबई : गोकुळाष्टमीपासून आवक वाढल्याने भाज्यांच्या दरामध्ये चांगलीच घसरण झाली आहे. पुढील दोन महिने अशीच स्थिती राहील. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत घाऊक बाजारात शुक्रवारी ७१२ ट्रक टेम्पो भरून भाजी आल्याची नोंद झाली. आवक वाढल्याने भाज्यांच्या दरांमध्ये ३०-४० टक्के घसरण झाली.मोसमातील ही सर्वाधिक भाजी आवक आहे. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, दोडका, भेंडी आदी भाज्या घाऊक बाजारात स्वस्त झाल्या आहेत.भेंडी २८ ते ३०, वांगी २८ ते ३०, कारली १२ ते १४, दुधी भोपळा १४ ते १६, कोबी १० ते १२, फ्लॉवर १४ ते १८, गाजर १८ ते २०, शिमला मिरची२४ ते २८ रुपये किलो आहे.कोथिंबीर एक रुपया जुडी दराने उपलब्ध आहे.>टोमॅटो झाला स्वस्तआवक वाढल्याने १०० ते १२० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो किरकोळ बाजारात ५० रुपयाने विक्रीसाठी उपलब्ध आहे. घाऊक बाजारात टोमॅटो २८ ते ३० रुपये किलो दराने विकले जात आहेत.>आवक वाढल्याने भाज्यांचे दर घसरले असून आवक कायम राहिल्यास किमतीत घट होण्याची शक्यता आहे. गोकुळाष्टमीपासून ३० ते ४० टक्के आवक वाढली आहे.- कैलास तांजणे,घाऊक व्यापारी
मुंबईत भाज्यांचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:27 IST