Coronavirus: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीस अखेर खुला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:17 IST2020-03-23T14:53:38+5:302020-03-23T15:17:30+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे.

Mumbai-Pune highway traffic finally open | Coronavirus: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीस अखेर खुला 

Coronavirus: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतुकीस अखेर खुला 

वैभव गायकर ,
पनवेल : सोमवारी सकाळी अचानकपणे बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गर्दी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. मात्र गर्दी ओसरल्याने पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला आहे.

अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तरी देखील मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचा लक्षात आल्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना कळंबोली येथेच रोखण्यात आले. यामुळे अनेक वाहनांना पोलिसांनी माघारी पाठविले. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक पोलिसांवर देखील मोठा ताण आला. वाहनांची संख्या कमी झाल्यावर पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले.

कारण नसताना घराबाहेर पडून वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहन चालकांना यावेळी सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहन चालकांनी घराबाहरे पडावे, असे अवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी केले आहे.

Web Title: Mumbai-Pune highway traffic finally open