शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

Mumbai Bandh : मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 12:26 IST

रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचं नाव असून दगडफेकीत रोहन गंभीर जखमी झाला होता.

नवी मुंबई - नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागले होते. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचं नाव असून दगडफेकीत रोहन गंभीर जखमी झाला होता. जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी (25 जुलै)  मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात हिंसाचार करणाऱ्या ५६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामधील अनेक जण हे परप्रांतीय असल्याचंही समोर आलं आहे. 

कळंबोलीत बंदला हिंसक वळण लागले, तर अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. यामध्येच रोहन तोडकर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारीपासून बंद करण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असे मेसेज कंपनीने आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत.

टॅग्स :Mumbai Bandhमुंबई बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदNavi Mumbaiनवी मुंबई