मुंबई गोवा महामार्ग नव्हे, देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती महामार्ग; मनसे करणार नामकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:49 IST2018-08-08T13:41:06+5:302018-08-08T13:49:26+5:30
१५ ऑगस्ट रोजी पलस्पे ते इंदापुर या मार्गावर एक लाख झाडे लावून या मार्गाचे देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती महामार्ग नामकरण करणार आहे.

मुंबई गोवा महामार्ग नव्हे, देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती महामार्ग; मनसे करणार नामकरण
वैभव गायकर
पनवेल : कोकणची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची दूरावस्था झाली आहे. लाखो प्रवासी दररोज महामार्गावरून प्रवास करत असतात. त्यामुळेच रस्त्याच्या दूरावस्थेबाबत मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे. १५ ऑगस्ट रोजी पलस्पे ते इंदापुर या मार्गावर एक लाख झाडे लावून या मार्गाचे देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती महामार्ग असे नामकरण करणार आहे.
मनसेच्या रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पनवेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करुन याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, सरचिटणीस गोवर्धन पोलसानी, विद्यार्थी सेनेचे अक्षय काशिद, प्रसाद परब यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. १५ ऑगस्टच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मनसे खळखट्टयाक आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.