शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी गटारात सोडण्याची नामुष्की

By admin | Updated: June 28, 2017 03:35 IST

महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेने शहरात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली असून, प्रक्रिया केलेले १८० एमएलडी पाणी रोज गटारात सोडले जात आहे. पाणीविक्री करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. पाण्याचा अपव्यय व पालिकेचे नुकसान थांबविण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी स्थायी समितीमध्ये केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरुळ व वाशीमध्ये १०० एमएलडी, ऐरोलीमध्ये ८० एमएलडी क्षमतेच्या केंद्रांचा समावेश आहे. देशात सर्वात अत्याधुनिक केंद्र उभारणारी महापालिका म्हणूनही नवी मुंबईचा नावलौकिक निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने मलनि:सारण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये सादर करताना प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याचा दावा केला होता; पण प्रत्यक्षात पाणीविक्री करण्यात यश आलेले नाही. सद्यस्थितीमध्ये सात मलनि:सारण केद्रांमधून प्रतिदिन १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याऐवजी ते खाडीमध्ये सोडून दिले जात आहे. यामुळे मलनि:सारण केंद्रांच्या देखभालीवर होणारा करोडो रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी गत आठवड्यात झालेल्या स्थायी समिती बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. प्रक्रिया केलेले पाणी खाडीमध्ये सोडून द्यावे लागते. मलनि:सारण केंद्र उभारल्यापासून योग्य नियोजन केले असते, तर आतापर्यंत या पाण्याची विक्री होऊ शकली असती; परंतु प्रशासकीय इच्छाशक्तीअभावी अद्याप पाणीविक्री होऊ शकली नाही.