शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

उरण-जेएनपीटीतील वाहतूककोंडीप्रकरणी बैठक, श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 2:42 AM

उरण-जेएनपीटी परिसरात दररोज उद्भवणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

उरण : उरण-जेएनपीटी परिसरात दररोज उद्भवणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्ते-उड्डाणपूल, कॉरिडोरच्या कामास होत असलेला विलंब, अनधिकृत कंटेनर यार्ड, बेशिस्त वाहतूक, वाढती रहदारी अशा अनेक कारणांमुळे परिसरात वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून उपाययोजनांबाबत होत असलेल्या विलंबाबाबत जाब विचारला. जेएनपीटी आणि गव्हाणफाटा-चिरनेर महामार्गावरील वाहतूककोंडीची काळजी घेण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही बारणे यांनी या वेळी दिल्या.जेएनपीटी-उरण परिसरातील विविध महामार्गावर नियमित वाहतूककोंडी होत असल्याने चालकांसह नागरिक, प्रवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या मागणीवरून जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी, जेएनपीटी प्रशासन भवनात बैठक बोलावली होती. बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत नवी मुंबई वाहतूक नियंत्रक शाखेचे डीसीपी सुनील लोखंडे, एसीपी राजेंद्र चव्हाण, उरण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे, जेएनपीटी प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे, मनीषा जाधव, एनएचआय अध्यक्ष प्रशांत फेगडे, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख तथा जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, विविध बंदरांचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक उपस्थित होते.अनधिकृत कंटेनर गोदामांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने बहुतांशी अवजड वाहने महामार्गालगत उभी केली जातात, त्यामुळे वाहतूककोंडी होत असून सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत असल्याची कैफियत स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडली. या अनधिकृत कंटेनर गोदामांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. वाहतूक पोलिसांना कर्मचारी कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवून देण्याची मागणी व करळफाटा महामार्गावर २४ तास रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी केली. यावर जेएनपीटी कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी, जेएनपीटीतील तीन टर्मिनलने प्रत्येकी २० प्रमाणे ६० सुरक्षारक्षक वाहतूक पोलिसांच्या मदतीला द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यात चिरनेर-गव्हाणफाटा मार्गावरील वाहनांना जेएनपीटी महमार्गावर जाण्याचा मार्ग गव्हाणफाटा येथून काढावा, त्यामुळे मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्याला मदत होईल, अशी मागणीही त्यांनी केली. यावर उत्तर देताना वनविभागाच्या अडचणींमुळे हे काम थांबले आहे. मात्र, हे काम एनएचआय अधिकाºयांनी पूर्ण करून देण्याचे मान्य केले. गोदामांचा सर्व्हे करण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली.जेएनपीटी महामार्गावरील पथदिवे बंद असून ते चालू करावेत, असे न्हावाशेवा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत कामत यांनी सुचविले. परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे, अशी सूचना बारणे यांनी अधिकाºयांना केली. एक महिन्यांनी यावर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.वाहतूक सुरक्षेअभावी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईत तोडण्यात आलेल्या जुन्या इमारतींचे डेब्रिजही उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आणले जात आहेत. रात्रीच्या वेळी १५० ते २०० डम्परमधून डेब्रिज आणले जात असल्याने वाहतूककोंडी होते. त्यावरही तत्काळ कारवाई करण्याची मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJNPTजेएनपीटी