घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:02 IST2025-06-04T08:37:48+5:302025-06-04T09:02:30+5:30

घणसोली बस आगारात अचानक बसने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती.

Massive fire suddenly broke out in buses parked at the Ghansoli NMMT bus depot | घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट

अनंत पाटील

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली एनएमएमटी बस आगारात उभ्या असलेल्या बसेसना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन बसेस जळून खाक झाल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उशिराने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यापूर्वीच तीन बसेस पूर्णपणे जळून गेल्या होत्या. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली. 

आगीत तीन बसेस पूर्णपणे जळून खाक  झाल्या आहेत. तर आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. बस आगारातील काही सतर्क कर्मचाऱ्यांमुळे त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे. चालक वाहकांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला इतर उभ्या असलेल्या बस बाजूला नेण्यात यश आले आणि मोठी वित्तहानी टळली.
 

Web Title: Massive fire suddenly broke out in buses parked at the Ghansoli NMMT bus depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.