शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बाजारपेठा, मंदिरे सजली

By admin | Updated: October 13, 2015 02:13 IST

उदे ग अंबे उदे... म्हणत घटस्थापनेने शहरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. दुर्गोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठा, मंदिरे सजली असून मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आहे

नवी मुंबई : उदे ग अंबे उदे... म्हणत घटस्थापनेने शहरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. दुर्गोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठा, मंदिरे सजली असून मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी धार्मिक, सामाजिक तसचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांची अलोट गर्दीचे शिस्तबध्द नियोजनासाठी सर्वच नवरात्रोत्सव मंडळाने कार्यकर्त्यांनी विशेष आखणी केली आहे. सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी माता मंदिर मंदिराच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कालिमाता मंदिर, दुर्गामाता मंदिर परिसरांमध्येही होम हवन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुग्धाभिषेक, काकड आरती, भजन, कीर्तन, गोंधळ, नवचंडी अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीनिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापनेसाठी लागणाऱ्या परडी, वस्त्र, घट, ओटी, नऊ वाती, सात धान्ये, फळे आणि वावरी (माती), अशा विविध वस्तूंनी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. कापूर, अत्तर, मध, अगरबत्ती आणि हळदी-कुंकू अशा वस्तूंनाही मागणी आहे. मंडईत अनेक विक्रेते लहान-मोठी दुकाने उभारून विविध वस्तूंची विक्र ी करीत आहेत.