शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचा शेतकऱ्यांना न्याय

By admin | Updated: October 13, 2015 02:11 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते. बाजार समिती प्रशासन व संचालकांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये मिळवून दिले आहेत. जामीनदारांकडून पैसे वसूल केल्याची ही राज्यातील पहिली घटना आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करणाऱ्या राधेशाम मोरया या व्यापाऱ्याने गतवर्षी आत्महत्या केली होती. यामुळे त्यांच्याकडे कृषी माल पाठविणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडण्याची भीती व्यक्त झाली होती. शेतकऱ्यांचे पैसे कसे वसूल करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. बाजार समितीमध्ये विश्वासाने शेतकरी त्यांचा माल पाठवित असतात. शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी व्यापाऱ्यांप्रमाणे बाजार समितीही घेत असते. मोरया यांनी आत्महत्या केल्यामुळे तत्कालीन संचालक अशोक वाळुंज व बाजार समिती प्रशासनाने सदर व्यापाऱ्याला अडत्याचे लायसन्स देताना जामीनदार असलेल्यांकडून पाच लाख रुपये वसूल केले आहेत. यामधील बाजार फी कपात करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये परत देण्यात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रथमच जामीनदाराकडून पैसे वसूल करून ते शेतकऱ्यांना देण्यात आल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी याविषयी बाजार समितीचे आभार मानले आहेत. सदर पैसे परत देताना बाजार समितीचे सचिव शिवाजीराव पहिनकर, माजी संचालक अशोक वाळुंज व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)