Maratha Reservation : 'जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:57 IST2021-06-25T20:57:01+5:302021-06-25T20:57:18+5:30
नवी मुंबईतील राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेस आठवले यांनी उपस्थिती लावली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हजर होते.

Maratha Reservation : 'जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे'
मुंबई - केंद्रीयमंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले आपल्या कवितेच्या शैलीमुळे देशभरात प्रसिद्ध आहेत. गल्लीपासून दिल्लीच्या संसंदेपर्यंत ते आपल्या कवितेतून कोणावर टीका करतात, तर कोणावर स्तुतीसुमने उधळतात. दोन दिवसांपूर्वीच मोदी आहेत नंबर 1 म्हणत त्यांनी मोदींचं कौतुक केलं होतं. आता, नवी मुंबईतील मराठा आरक्षणाच्या बैठकीत त्यांनी नारायण राणेंचं कवितेतून कौतुक केलंय.
नवी मुंबईतील राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेस आठवले यांनी उपस्थिती लावली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, आयोजक सुरेश पाटीलसह राज्यभरातील अनेक मराठा समाज आरक्षणासाठी लढणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी या परिषदेस उपस्थित होते. त्यावेळी, भाषण करताना नारायण राणेंचं कवितेतून कौतुक केलं. त्यावेळी, राणेंनाही हसू आवरले नाही, तर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
'जे मराठा समाजाचं आहे खणखणीत नाणे, त्याचे नाव नारायण राणे', अशा शब्दात कांव्यपक्तींतून आठवलेंनी माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे यांचं कौतुक केलंय. महाविकास आघाडीचं काम आहे फक्त खाणे, पण आमचं काम आहे मराठा आरक्षणाचं गीत गाणे, असे म्हणत रामदास आठवेंनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, मराठा आरक्षणासाठी रिपाइंसह भाजपाचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलं.
अनिल देशमुखांवरील कारवाईवर राणे म्हणतात
भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी "करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे," अशा शब्दात अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईवर मत व्यक्त केलंय. नारायण राणे म्हणाले, "ही कायदेशीर कारवाई आहे, राजकीय नाही. जसं मराठीत म्हण आहे, करावे तसे भरावे, आता भरण्याची वेळ आहे. जे केलं त्याची चौकशी सुरू आहे. यामुळे यात कुणी राजकारण करू नये, राष्ट्रवादी काँग्रेसने तर करूच नये, आता हे सिद्ध होऊ द्या बाहेर येऊ द्या, मग बघू काय आहे ते.