Maratha Kranti Morcha : कामोठेत रस्ता रोकोदरम्यान महामार्गावर टायर जाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 23:26 IST2018-07-23T23:24:21+5:302018-07-23T23:26:37+5:30

पनवेल-सायन महामार्गावर मोर्चेकऱ्यांनी टायर जाळले

maratha kranti morcha protesters burn tyres on panvel sion road | Maratha Kranti Morcha : कामोठेत रस्ता रोकोदरम्यान महामार्गावर टायर जाळले 

Maratha Kranti Morcha : कामोठेत रस्ता रोकोदरम्यान महामार्गावर टायर जाळले 

कळंबोली: मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मोर्चेकरी काकासाहेब शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान मराठा समाजाच्या तरूणांनी कामोठेतील पनवेल-सायन महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर टायर जाळून शासनाचा निषेध नोंदवला. पोलीस वेळेत पोहोचल्याने मोठी कोंडी झाली नाही.

मराठा आरक्षणावरून मराठा समाजाने राज्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलने सुरू केलं आहे. औरंगाबादमध्ये आंदोलन करताना मोर्चेकरी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेचे पडसाद नवी मुंबई, रायगड परिसरात उमटले. आज रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मराठा समाजाच्या मोर्चेकरांनी कामोठे हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणारे वाहने  आडवली. त्यामुळे काही प्रमाणात वाहनांना अडथळा निर्माण झाला. पोलिसांनी त्वरित आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले.

Web Title: maratha kranti morcha protesters burn tyres on panvel sion road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.