Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:08 IST2025-07-05T18:06:47+5:302025-07-05T18:08:19+5:30
Navi Mumbai Black Magic: नवी मुंबईत एका व्यक्तीने विकृतीचा कळस गाठला. काळा जादूच्या नावाखाली पत्नी आणि सासूला नग्न करून...

Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
नवी मुंबईत एका व्यक्तीने विकृतीचा कळस गाठला. काळा जादूच्या नावाखाली पत्नी आणि सासूला नग्न करून विधी करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्याने दोघींचेही अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. ही लज्जास्पद घटना एप्रिल ते जुलै दरम्यान नवी मुंबईतील आरोपीच्या घरी घडली. याप्रकरणी आरोपी जावयाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी आहे. दरम्यान, १५ एप्रिल रोजी आरोपीने त्याची पत्नी आणि सासूला सांगितले की, त्याच्या मेहुण्याच्या लग्नात अनेक अडथळे येत आहेत आणि त्यांना काळ्या जादूच्या मदतीने दूर करता येईल. त्यानंतर आरोपीने पत्नी आणि सासूला त्यांच्या अंगावरचे कपडे काढायला सांगितले. दोघींनी कपडे काढल्यानंतर आरोपीने त्यांचे अश्लील फोटो काढले. आरोपीची क्रूरता इथेच थांबली नाही. त्याने हे अश्लील फोटो पत्नीच्या वडिलांना आणि भावाला व्हॉट्सअॅपवर पाठवले. यानंतर महिलेच्या नातेवाईकांना ताबडतोब पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
दरम्यान, ३ जुलै २०२४ वाशी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी), ३५२ (जाणीवपूर्वक अपमान), आयटी कायदा आणि महाराष्ट्र काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रोपीला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पीडित महिलेची आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.