शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गृहप्रकल्पाला महारेराचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:43 IST

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम पुढील महिनाभरात सुरू करण्याची सिडकोची योजना आहे.

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम पुढील महिनाभरात सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी त्याची महारेराकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगीच मिळाली नसल्याने प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई क्षेत्रात विविध आर्थिक घटकांसाठी पुढील पाच वर्षांत ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. मागील दोन-तीन वर्षांत यापैकी जवळपास पाच हजार घरे बांधण्यात आली आहेत. तर अल्प व अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी १५ हजार १५२ घरांच्या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले आहे. ही घरे घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी या नोडमध्ये बांधली जाणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. सिडकोच्या विविध गृहप्रकल्पांची कामे केलेल्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीला या नव्या गृहप्रकल्पाच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. पुढील महिनाभरात एकाच वेळी पाचही नोडमधील गृहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याची सिडकोची योजना आहे. या घरांची अंदाजित किंमतही निश्चित करण्यात आली आहे. परंतु तळोजा येथील नियोजित गृहप्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे नवीन गृहप्रकल्प उभारताना म्हाडा आणि सिडको या राज्य सरकारच्या अंगीकृत महामंडळांनाही महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या गृहप्रकल्पांची नोंदणी करण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली होती. परंतु पर्यावरणाच्या परवानगीअभावी सिडकोला तशी नोंद करता आली नाही. असे असले तरी संबंधित परवानगी प्राप्त होताच नियमानुसार महारेराकडे नोंदणी केली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट केले आहे. सध्या प्रस्तावित असलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू होताच आणखी एक पंधरा हजार घरांचा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली.