शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
6
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
7
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
8
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
9
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
10
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
11
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
12
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
13
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
14
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
15
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
16
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
17
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
18
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
19
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
20
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!

महाविकास आघाडीचं नवीन मिशन ठरलं; उद्या पहिला महामेळावा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 17:22 IST

महाविकास आघाडीचा पहिला मेळावा उद्या; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात यश मिळवणारी महाविकास आघाडी आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र लढणार आहे. सध्या नवी मुंबईत भाजपाची सत्ता आहे. राज्य सरकारपाठोपाठ नवी मुंबईतही भाजपाला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. उद्या शहरात महाविकास आघाडीचा पहिला मेळावा होणार असून त्याला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत मोठ्या राजकीय हालचाली घडल्या होत्या. राष्ट्रवादीच्या तब्बल ४८ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पालिकेत भाजपाची सत्ता आली. आता भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या महाविकास आघाडीचा पहिला मेळावा शहरात होणार आहे. या मोर्चाला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विश्वजीत कदम उपस्थित राहतील. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केल्यानं सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते गणेश नाईक यांनी मुलगा संदीपसह भाजपामध्ये प्रवेश केला. ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदारही झाले. २०१५ मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही गणेश नाईक यांनी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता राखली होती. विधानसभा निवडणुकीआधी भाजपावासी झालेल्या नाईक यांना आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान असेल.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका